‘या’ जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९७८ नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण

कोरोना

औरंगाबाद – जिल्ह्यात रविवारी एकूण ६३९ जणांनी लस घेतली आहे. तर यामध्ये ग्रामीण भागातील ६३९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत एकुण ४४२९७८ या मध्ये ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली आहे.

रविवारपर्यंत ग्रामीणमध्ये १८६१७८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर २०६१६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ग्रामीणमध्ये एकुण २०६७९४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर औरंगाबाद शहरामध्ये १९०२०१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ४५९८३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरामध्ये एकुण २३६१८४ जणांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरानाचा संसर्गाच्या रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आता शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आपणास दररोज वाढणाऱ्या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे आता औषधोपचारासह आता लसीकरणाचा वेग वाढवणे ही काळाजी गरज निर्माण झाल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या –