नवी दिल्ली – कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. आज आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
देशात आत्तापर्यंत 19 कोटी 49 लाख लोकांना करोना लसींचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. काल शनिवारी 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 82 हजार 398 जणांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील 99 लाख 79 हजार 676 जणांना आत्तापर्यंत करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1 कोटी 49 लाख 47 हजार 941 फ्रंट लाइन वर्कर्सना करोनाचा पहिला डोस देण्यात आला असून, यापैकी 83 लाख 22 हजार 58 जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. 60 वर्षांवरील 1 कोटी 82 लाख 42 हजार 554 जणांना दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- १ जून नंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का? याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या