राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात 6,959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७९,६७,६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ७६,७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर देशामध्ये गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 649 नव्या रुग्णांची भर पडली असून 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 23 हजार 810 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 37 हजार 291 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख 81 हजार 263 इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –