पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज नव्याने ५५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६९ हजार २६१ इतकी झाली आहे.
शहरातील १ हजार ०२३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५४ हजार ०१३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ९६६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ८४ हजार ८७५ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ७ हजार ०४४ रुग्णांपैकी ९६३ रुग्ण गंभीर तर १,६४७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने २७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार २०४ इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढच्या ४८ तासांत वादळी पावसाची शक्यता
- राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार का? याबाबत जयंत पाटील यांनी केलं महत्वाचं भाष्य
- राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
- देशावर ‘म्युकरमायकोसीस’चे मोठे संकट; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय