सरकारची मदत तर सोडा पंचनामे सुद्धा झाले नाही; शेतकऱ्यांने सांगितले आपले दुःख…पहा काय ते….

शेतकरी

औरंगाबाद – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला होता तर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.

मात्र, सणावाराच्या तोंडावर आर्थिक संकट शेतकऱ्यावर कोसळलं असतानाच झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामेच होत नसल्यानं रब्बी पिके तरी कसं घेणार? बियाणांचा खर्च कसा उचलणार असे अनेक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. अशाच संकटातून जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपली व्यथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मांडली आहे.

‘आमच्याकडे पंचनाम्याला कोणीच आलं नाही. आठ दिवसांनी जरी तुम्ही पाहणी करायला आला तरी एकदम भयाण परिस्थिती आहे. अधिकारी देखील आले नाहीत. मराठवाडा, विदर्भाकडे दुर्लक्ष केलं जातंय. आधीच्या सरकारच्या काळात खतं, बियाणं चांगल्या प्रतीचं मिळायचं. आता किमान पाहायला कोणी तरी यावं,’ अशी हताश भावना व्यक्त केली.

या शेतकऱ्याशी झालेलं बोलणं अनिल बोंडे यांनी ट्विटरवर ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘दिवाळी येत आहे महाभकास आघाडीची मदत तर सोडा पंचनामे सुद्धा झाले नाही. वैजापूर जि. औरंगाबाद येथील शेतकऱ्यांने सांगितले आपले दुःख…’ अशी टीका त्यांनी केली आहे.
ऐका शेतकऱ्याचं दुःख –

महत्वाच्या बातम्या –