सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांचा निधी

हातपंप

सोलापूर :  हापसा “हापसी” किंवा “हापशी” म्हणजे कूप नलिकेतून हाताच्या बलाने जमिनीतील पाणी वर काढणारे साधे यंत्र होय. हे बहुतेकदा ग्रामीण भागात, जेथे वीज पोचलेली नाही अशा ठिकाणी आढळते. हापसा हा पाणी उपासणारा एक प्रकारचा हातपंप असतो. हापसा हा मानवी बलाने चालत असल्यामुळे साधारण ५० मीटर पेक्षा कमी खोल असणाऱ्या कूप नलीकेसाठीच त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. दुष्काळी परिस्थितीत गावातील पाण्याची तहान भागविण्यासाठी ग्रामीण भागात हातपंपांचा आधार घेण्यात येतो.

तसेच सोलापूर मध्ये उन्हाळ्याची तयारी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू झाली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हातपंप हे दुरुस्त असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, तर पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

यावेळी या बैठकीत खूप विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पाणी टंचाई या विषयावर चर्चा झाली. त्यावर तातडीनं निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये हातपंप आणि पाईपचा विषय आला. त्यामुळे त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

फेब्रुवारीच्या अखेरीस कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा : दादा भुसे

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

येवलेंचा चहा भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक खुलासा