शेतकऱ्यांचे आंदोलन आणि करोना विषाणूचे संकट पाहता सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सोनिया गांधी

मुंबई – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या ९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. देशात कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि करोना विषाणूचे संकट पाहता सोनिया गांधी यांनी या निर्णय घेतला आहे.

देशात सध्या कोवीड महामारीची परिस्थीती आहे तसेच जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरु आहे. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबर रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पहाता सोनिया गांधी यांचा वाढदिवस उत्सवीपद्धतीने साजरा करु नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –