पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपयांचा विशेष निधी – बबनराव लोणीकर

बबनराव लोणीकर

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेबाबताची आढावा बैठक मंत्रालयात झाली.या परिस्थितीमुळे पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार आहे. तसेच पूरग्रस्त गावांतील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी (ता. १३) दिली.

बैठकीत श्री. लोणीकर म्हणाले, की कोल्हापूर, सांगली व सातारा या भागांतील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ६०४, सांगलीमध्ये १३०, साताऱ्यामध्ये ९८ पाणीपुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. या सर्व भागांतील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरीनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा.

Loading...

तसेच या भागातील जे जलस्रोत दूषित आहेत, त्या जलस्रोतांची तातडीने तपासणी करावी आणि ते पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, तसेच बाकी जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत. पुरामुळे या भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये गाळ साचणे, अनेक विहिरी ढासळल्या आहेत.

या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनांमध्ये कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्वेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करावे व जिल्हा स्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. राज्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली. १००० लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना ५० हजार तर १००० च्या पुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना १ लाख रुपये निधी प्राथमिक स्वरूपात त्वरित वितरित करण्यात येणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

पाच कोटी ‘रेशीम’रोपांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधी – सुधीर मुनगंटीवार

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

महाराष्ट्रात पाणी अडवण्यासाठी नद्यांवर बंधारे नसल्यामुळे तब्बल ४० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेलं

Loading...