शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता ‘या’ योजनेद्वारे सरकार खरेदी करणार जनावरांचे शेण

जनावरांचे शेण

रायपूर – आपल्याकडे शेतीबरोबर पुरक असा जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. शेतीबरोबरच पशुपालनाला खूप महत्त्व आले आहे. गाईचे दूध, गोमुत्र व शेण याला बाजारात मोठी मागणी आहे. सध्या गोमुत्राला फार मोठया प्रमाणात महत्त्व प्राप्त आहे. तसेच गोमुत्र व शेणाचा औषधांसाठी व खतांसाठीही वापर होतो. या व्यवसायात येथील शेतक-यांना पशूंच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ब-याच ठिकाणी प्राण्यांना रोग, इतर आजारांमुळे प्राणास मुकावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या दोन्हींकडे लक्ष देत छत्तिसगढ सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे. त्यानुसार आता सरकारी यंत्रणा जनावरांचे शेण खरेदी करणार आहे.

कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’, रामदेव बाबांनी जगासमोर ठेवले कोरोनावरील औषध

सरकारने या योजनेला ‘गोधन न्याय योजना’ असे नाव दिले आहे. तसेच या राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता असून तेथील मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या योजनेची माहिती ट्विटरवर दिली आहे. देशातील हे असे पहिलेच राज्य आहे की जे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या शेणाचे पैसे देणार आहे. २१ जुलै २०२० पासून या राज्यात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.

आठवडाभर विश्रांतीनंतर मॉन्सूनची वेगाने वाटचाल; देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल

तसेच मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री रवींद्र चौबे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठीची खास समिती कार्यान्वित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच पुढील कालावधीत आणखी २८०० गावांमध्ये शेण खरेदीसाठीची कार्यवाही करणारे असे केंद्र कार्यान्वित केले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतातला शेवटचा ऊस गाळपाला येईपर्यंत कारखाने सुरु राहिले पाहिजेत – ऊस मंत्री सुरेश राणा

आता मजदूरांना होणार फायदा; देशातील वीस राज्यात सुरू झाली ‘ही’ योजना