नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कांद्याची टाकलेली रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. त्यामुळे अनेकांना परत कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. रोपे जानेवारीच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ लागल्याने कांदा लागवडींना वेग आला आहे. चालू वर्षी मिळालेला विक्रमी दर, मुबलक पाणीसाठा ठा यामुळे चालू वर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती आहे.

विदर्भात थंडीची लाट

मात्र, सुरुवातीला अनेक कांदा रोपे खराब झाली. प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा, येवला, चांदवड, मालेगाव व येवला तालुक्यांत अधिक फटका बसला. त्यामुळे लागवडीचे नियोजन पहिल्या टप्प्यात कोलमडले. अनेक शेतकऱ्यांनी एकदा, दोनदा तर काहींनी तीनदा बियाणे टाकून कांदा रोपवाटिका तयार केल्या आहेत. चालू वर्षी सर्वाधिक लागवडी या कळवण तालुक्यात झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सटाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लागवड कमी झाली आहे. मालेगाव, सिन्नर, चांदवड व येवला तालुक्यांत लागवडी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.