SSC Ricruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

SSC Ricruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

SSC Ricruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! कारण गेल्या अनेक दिवस सरकारी परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commition SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेमधील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 4500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या 4500 पदांमध्ये लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर इत्यादी पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 4500 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार दिनांक 4 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी इच्छुक उमेदवारांनी या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या बातम्या