४२ दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु

एसटी

बेचाळीस दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यातील विविध भागात घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची पहिली बस चंद्रपूर आगारातून काल रवाना झाली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा अंतर्गत बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके गतिशील झाली.

राज्यात शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

तेलंगाना राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस आज चंद्रपूर एसटी स्टॅन्डला आली. त्यामुळे हैद्राबाद वरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. त्यानंतर सिंदेवाही, नागभीड, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यांच्या गावाला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून राज्य शासनाने मजुरांना एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारीच हे मजूर चंद्रपूरमध्ये पोहचल्यामुळे 26 जणांच्या ताफ्याला मूल, सिदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी येथे रवाना करण्यात आले.

शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

तत्पूर्वी, गेल्या अनेक दिवसांपासून आगारात जमा असलेल्या एसटी बसेसचे सॅनीटायझेशन करण्यात आले. तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांना देखील आवश्यक वैद्यकीय सल्ला व शारीरिक अंतर राखण्याचे निर्देश दिले गेले. केवळ 26 नागरिकांना या बसमधून रवाना करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!!

यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी आगार व्यवस्थापक सचिन डफळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागापुरे, तहसीलदार निलेश गौंड, नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, प्रकाश तोळकर, शेखर उईके आदी उपस्थित होते. नगरसेवक नंदू नागरकर यांनी यावेळी या प्रवाशांची खानपाणाची व्यवस्था केली.

महत्वाच्या बातम्या –

नाशिक : बागायतदारांसाठी वीजदर कमी करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्या – डॉ. नितीन राऊत

मंत्री दुष्काळ दौरे काढताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात ; वडेट्टीवारांचा आरोप