‘या’ आजारांनसाठी फायदेशीर आहे स्टार फ्रुट, जाणून घ्या

अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते.

स्टार फ्रुट हे एखाद्या चांदणीसारखे दिसते. कापल्यानंतर हे फळ चांदणीच्या आकारात दिसत असते. या फळाचे रंग हा फिकट हिरव्या रंगाचे असते.  पिकल्यानंतर याचा रंग हा नारंगी र होत असतो.  दरम्यान  स्टार फ्रुट हे वर्षभर मिळत असते. वर्षभरात या फळाचे वर्षभरात दोनदा उत्पादन होत असते. या फळापासून आपल्याला अनेक जीवनसत्व मिळत असतात. दरम्यान व्हिटॉमीन -सी  मिळाल्याने आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  यासह पचन संस्थाही चांगली ठेवण्यास हे फळ उपयुक्त आहे

  • स्टार फ्रुट मध्ये व्हिटॅमिन ब देखील असतं. सोबतच यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह यासारखे तत्व देखील आढळतात. ही सर्व तत्वं आपल्या शरीरातील रक्तप्रवाहाची क्रिया सुरुळीत ठेवण्याचं काम करतात. यामुळे ह्रदय विकाराचा झटका, स्ट्रोक आणि क्लोटिंग (रक्ताच्या गाठी होणं) या समस्या उद्भवत नाहीत.
  • आजकाल कॅन्सर सारखा भयानक रोगही सामान्य होत चालला आहे. कारण हल्ली कॅन्सरच्या रुग्णांची संख्या आपल्या देशात झपाट्याने वाढत चालली आहे. पण स्टार फ्रुटचे सेवन आपल्याला या आजारापासून वाचवण्यास लाभदायक ठरु शकतं. कारण या फळात बीटा-कॅरोटीन आढळतं. यामध्ये असे काही गुणधर्म आढळतात जे आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढण्यास मज्जाव करतात. सोबतच हे अॅंटीऑक्सिडंट सारखं काम करतं. यामुळे शरीराला निरोगी राहण्यास मदत मिळते.
  • जसं आम्ही आधीच सांगितलं की स्टार फ्रुट मध्ये सायट्रिक अॅसिड असतं त्यामुळे त्यातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन क ची पूर्तता होते. व्हिटॅमिन क हेच व्हिटॅमिन आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. सोबतच स्टार फ्रुट खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित सर्व आजार दूर होतात. स्टार फ्रुट मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे आपली पचनक्रिया सुरुळीत ठेवण्याचं काम करतं. बद्धकोष्ठता, अतिसार, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरतं.

महत्वाच्या बातम्या –