चांगले पैसे कमवायचे असेल तर सुरु करा ‘हा’ व्यवसाय

व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला जी जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण आपण त्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो.

देशात आता सध्या सण समारंभांचं वातावरण झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत एका मागोमाग सारखे सण येणार आहेत. अशा वेळेस जर तुम्हाला चांगला पैसे कमवायचे असेल तर हा व्यवसाय तुम्ही फक्त १ लाखात सुरू करू शकता. आणि चांगले पैसे कमवू शकतात.

तुम्हाला बिस्किट तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करता येईल. असा व्यवसाय सुरू करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आवश्यक आहे. हा व्यवसाय सुकृरू करण्यासाठी जागेची गरज पडत असते. यासह कमी क्षमतेची यंत्रणा आणि कच्च्या मालामध्ये गुंतवणूक करावी लागत असते.

बिस्कीटाच्या व्यवसायासाठी लागणारा खर्च –

बँकिंग भांडवलामध्ये सुमारे १ लाख ८६ हजार रुपये खर्च तुम्हाला येईल. यामध्ये कच्चा माल, साहित्य आणि कामगारांचा पगार, पॅकिंग आणि भाडे इत्यादींचा खर्च समाविष्ट आहे. निश्चित भांडवलासाठी याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये पर्यंत असेल. यात सर्व यंत्रसामग्री आणि उपकरणाच्या किंमतींचा समावेश असेल. एकूण खर्चाबद्दल सांगायचे तर तुम्ही बिस्किट उत्पादनाचा व्यवसाय सुमारे ३ लाख ३६ हजार लाख रुपयांपासून सुरू करू शकतकरता येतो. यात तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त ९० हजार रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम मुदत कर्ज आणि कार्यरत भांडवलाच्या कर्जावर वाढवता येते.

महत्वाच्या बातम्या –