बोंड आळीने नुकसान झालेल्या कपाशीचे पंचनामे करण्यास सुरूवात

परतूर: लोणी येथे आज कपाशीवर झालेल्या बोंड आळीच्या प्रदूर्भावणे कपाशीचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा रोग जालना जिल्ह्या सह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दिसून आला याची दखल घेत ना . पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी महसूल व कृषी या विभागांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेत आज लोणी तसेच संपूर्ण परिसरात पंचनामे सुरू झाले आहेत.

हे पंचनामे करीत असताना गजानन लोणीकर उपसरपंच लोणी , ग्रामसेवक वाघ , तलाठी श्री पाटील, कृषिसहायक तसेच शेतकरी लक्षीमन मारोतराव यादव , मोहन यादव , रामदास काकडे, उत्तम तुवर , उमेश यादव , पुरुषोत्तम यादव , श्रीरंग यादव , अशोक चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते. लोनिकरांच्या शेतकाऱ्यांप्रती असलेल्या आस्थेचं ग्रामस्थांनी यावेळी कौतुक केलं