बाधित जिल्ह्यांसाठी आणखी एक हजार कोटी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बाधित जिल्ह्यांसाठी आणखी एक हजार कोटी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय shetkari

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत सहा हजार 500 कोटींची मदत वितरीत केली आहे. परंतु, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या जवळसपास 16 लाख 30 हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची यादी व त्यांच्यासाठी लागणारी रक्‍कम 15 दिवसांत कळवा, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणार- मुख्यमंत्री

कोल्हापूर, सांगली, बीड, सोलापूर, नाशिक,  नगर, यवतमाळ यासह अनेक बाधित जिल्ह्यांसाठी एक हजार कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी दुष्काळाचा सामना करीत पिकांची जोपासना करणाऱ्या बळीराजाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले. राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने झाले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने सात हजार 202 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला. त्यातून केंद्र सरकारने 956 कोटींना मंजुरी दिली असून ही रक्‍कम राज्य सरकारला वितरीत केल्याचे समजते.

गोंदिया, नागपूर, वर्धामध्ये पावसाने लावली हजेरी

त्यानुसार जिल्हा स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मार्चएण्डपर्यंत ही रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचेही मदत व पुनवर्सन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले.