कांदा निर्यात बंदी उठवण्याची राज्य सरकारने केली केंद्र सरकारकडे मागणी

कांदा

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. दरम्यान देशी कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. कांदा निर्यात बंदी उठवण्याची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

कांद्याचे भाव काम झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव आणखी कोसळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. कांदा निर्यातीवर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.कांद्याचे भाव वाढू लागल्याने सरकारने कांदानिर्यातबंदी जाहीर केली. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.