…अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन – सुकाणू समिती

जळगाव: शासनाने शेतकऱ्यांच्या संपा नंतर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत राहिलेल्या त्रुटी दूर करुन प्रत्येक शेतक-याला मदत देण्याची घोषणा केली. परंतु त्यात प्रामुख्याने कर्र्जमाफीची घोषणा केलेल्या तारखेपासूनचे व्याज माफ़ करण्याचा आदेश नाही, तसेच २०१७ चे थकबाकीदार यांना माफीची घोषणा झाली, ते व अर्ज न केलेले शेतकरी यांचे साठी अर्ज केव्हाही भरता येईल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली नाही, त्या साठी आदेश गरजेचे आहेत. तसेच दीड लाखावरचे थकबाकीदार शेतकऱ्यांचे मुद्दल पेक्षा कर्ज भरु न शकल्याने व्याज जास्त झाले व ते थकित झाल्याने ते बाकी आहे,या वर्षी पुन्हा बोंड अळी व शेतमालास भाव न मिळाल्याने त्यांना कर्ज भरने शक्य नाही. त्यामुळे ही मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे समन्वयक व सुकाणु समिती सदस्य एस. बी. पाटील यांनी केली आहे.

जे शेतकरी कर्जमाफी च्या लाभा पासून वंचित राहत आहे. त्यासाठी त्यांचे पूर्ण कर्ज माफ होणे गरजेचे आहे. परंतु तो पर्यन्त बँकानी व्याज माफ़ करने व शासनाने त्यांचे दीड लाख भरून कर्जाचे पुनर्गठन करने हा पर्याय वापरल्यास प्रत्येक शेतकरी उभा राहु शकतो व या योजनेत भाग घेऊ शकतो. राष्ट्रीयकृत बँक अद्याप कर्ज माफी ची रक्कम आली नसल्याचे सांगतात त्या बाबतीत आदेश व्हावेत.

बोंड अळी ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात कबूल केलेली मदत कोणतेही कारण न देता विना विलंब द्यावी शासनास विधानसभेत घोषणा करताना किती शेतकऱ्यांनी विमा काढला,किती कंपनी कोर्टात जाणार हे माहीत होते .आता कारणे न देता शेतकऱ्यांना मदत द्या व कंपनी कडून पैसे आल्यावर आपण ते सरकार जमा करावे. शासन बी टी कंपन्यांवर योग्य ती कार्यवाही करत आहे ती आपण करत बसा परंतु शेतकऱ्यांना वेळेवर बियाने कसे उपलब्ध होणार कारण दुकानदार बुकिंग करणार नाहीत.व कंपन्या किती देणार कोणते देणार माहीत नाही, पुन्हा नफेखोरी मरनार शेतकरी या बाबतीत उद्या जिल्ह्यात येणाऱ्या पालक मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषजी देशमुख व जलसंपदा मंत्री गिरिषजी महाजन यांनी घोषणा करावी. अन्यथा या पुढे जिल्ह्यात त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले जाईल व त्यानंतर पुन्हा उग्र आंदोलन केले जाईल, असे पाटील यांनी कळवले आहे.