राज्यातील शाळा सुरु होणार पण पाळावे लागणार नियम; जाणून घ्या नियमावली

शाळा

मुंबई – गेल्यावर्षीपासून राज्यासह देशात कोरोना रोगाने थैमान घातला आहे. तर यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका भारताला चांगलाच बसला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. तर  या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. महाराष्ट्रतील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

तर आता एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला असल्याची माहिती वर्षा गायकवाड. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यावेळी जरी करण्यात आलेल्या शासन नियमात म्हटले आहे कि, राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी पाळावे लागणार हे नियम –

  • शिक्षकांचं लसीकरण होणं आवश्यक, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये.
  • शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, 15-20 विद्यार्थी एका वर्गात, दोन बाकांमध्ये 6 फुटांच अंतर
  • शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात बोलावण्यात यावं.
  • मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या (रेड झोन) भागात शाळा सुरू करता येणार नाहीत, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यायची आहे.
  • विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

महत्वाच्या बातम्या –