मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १९३ साखर कारखाने उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९८ खासगी व ९६ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९३ साखर कारखान्यांकडून ६५९.०६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात २३ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ६५७.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) ९.९७ टक्के इतका आहे.
तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १५६.५९ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १४०.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा अर्ज जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
- शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू
- राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
- कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द
- कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ