पावसासाठी करावी लागणार आणखीन आठवड्याची प्रतीक्षा; बळीराजा चिंतेत

पुणे: मान्सूनला सुरुवात झाली असली तरी अद्याप चांगल्या पावसासाठी आणखीन आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार. पुढील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसेल.

कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने, पहिले दोन – तीन दिवस कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सर्वच भागातून पाऊस गायब झाल्याच चित्र आहे. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत आहे.

दरम्यान, कोकण आणि गोवा वगळता महाराष्ट्रातील अन्य भागात आठवडाभर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.