जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करा – ॲड.यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

वाशिम – दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करताना यानिमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना विषाणू संसर्ग विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

ॲड.श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना बाधित व्यक्तींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच बरे होऊन परतलेल्या व्यक्तींना समाजाकडून चांगली वागणूक मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास कोरोना संसर्ग विषयक अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा – जयंत पाटील

ॲड.श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी, गतवर्षी मिळालेली नुकसान भरपाई माहिती घेतली. तसेच यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना केल्या. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

जिल्हाधिकारी श्री.मोडक यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.

नुकसानग्रस्त भागातील रस्ते-पूल तत्काळ दुरुस्त करावेत – ॲड.यशोमती ठाकूर

पोलीस विभागाच्यावतीने लॉकडाऊन काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी दिली. आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक उपाययोजनांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत करण्यात आलेल्या अन्नधान्य वितरणाची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम