ग्रामीण भागात ‘तंत्रज्ञान प्रणाली’ वापरून आरोग्ययंत्रणा मजबूत करा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

बच्चू कडू

सध्या ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा खूप ढासळली असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहेतच, ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था सुधारली तर गाव सुधारेल.

अमरावती येथे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चू कडू(Minister Bachchu Kadu) हे शासकीय विश्राम गृहात बैठकीदरम्यान म्हणाले कि, ‘ग्रामीण भागातील लोकांना विशेषोपचार कुशल तज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी तंत्रज्ञान प्रणाली(Technology system) व यंत्रणेचा वापर सुरु करण्यात यावा तसेच धरणी, चिखलदरासारख्या दुर्गम भागातील हॉस्पिटल्स मध्ये टेलिमेडिसिन प्रणाली नियमित करण्यात यावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पुणे मुंबई नागपूरच्या तज्ञ् डॉक्टरांचे उपचार मिळवून करावी. मुख्यतः टेलिमेडिसिन प्रणाली सुरु करावी ह्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होईल असे ते म्हणाले. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी मंडळी उपस्थित होते.

तसेच रुग्णालयांमध्ये डिजिटल कक्षाची उभारणी करावी, सर्व डॉक्टरांनी दूरदूष्टीप्रणाली द्वारे वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करावे तसेच रुग्णालयात माहिती देणारे फलक लावण्यात यावे.

बालरोग,स्त्रीरोग,हृदयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजर, जुनाट रोग अश्या अनेक आजारांवर उपचार तज्ञ् डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात पाचारण करण्यात यावे. असा निर्देश मंत्री बच्चू कडू यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –