Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: दोन वर्षांपूर्वी कोरोना (Covid-19) विषाणूने जगामध्ये थैमान घातले होते. कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला होता. जगभरातील करोडो लोक कोरोना विषाणूच्या विळख्यामध्ये आले होते. तर, यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. कोरोनाच्या महामारीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागृत झाले आहे. अशा परिस्थितीत जगामध्ये अनेक विषाणू आणि बॅक्टेरियाचे संक्रमण पाहायला मिळत आहे. तर आता सध्या जगामध्ये आणखी एक विषाणू दिसून आला आहे. हा विषाणू स्ट्रेप ए इन्फेक्शन (Strep A Infection) म्हणून ओळखला जात आहे. या विषाणूने युके मधील सहा मुलांचा बळी घेतला आहे. हा रोग वेगाने पसरत आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची खूप आवश्यकता आहे.

नक्की काय आहे स्ट्रेप ए इन्फेक्शन (Strep A Infection)?

आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्ट्रेप ए ला ए स्ट्रेप्टोकोकस (A streptococcus) असे देखील म्हणतात. हा एक जीवाणूजन्य आजार आहे. या आजारामध्ये त्वचा आणि घशामध्ये जिवाणू आढळून येतात. हे जिवाणू एखाद्या व्यक्तीमध्ये गंभीर संसर्गाचे कारण बनू शकतात. घसा खवखवणे, नेक्रोटाइझिंग फ्लेबिटिस, स्कार्लेट फीवर, सेल्युलायटिस, स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम, संधिवाताचा ताप, पोस्ट-स्ट्रेप्टोकोकल ग्लोमेरुलोनेफ्राइटिस रोग इत्यादी रोगांचा यामध्ये समावेश आहे. स्ट्रेप ए इन्फेक्शन हा एक संसर्गजन्य रोग असून, एकमेकांच्या संपर्कात आल्यावर हा वेगाने पसरतो.

स्ट्रेप ए इन्फेक्शनमध्ये संसर्ग झाल्यामुळे लक्षणे दिसू लागतात, तर काही लोकांना यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाही. स्ट्रेप ए इन्फेक्शन गट ए चा झाल्यास घसा खूप जास्त खवखवायला लागतो. यामध्ये प्रामुख्याने काहीही घेताना घसा दुखतो, ताप येतो, शिंका येतात, त्वचेवर पुरळ उठते, टॉन्सिल सुजायला लागतात.

स्ट्रेप ए इन्फेक्शन या विषाणूचा सर्वाधिक परिणाम दहा वर्षाखालील मुलांवर अधिक होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर अशी लक्षणे असणाऱ्या कोणत्याही मुलाच्या किंवा मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आपल्या मुलांना येऊ देऊ नका. त्याचबरोबर हा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःची आणि आपल्या आजूबाजूंची योग्य ती काळजी घ्या.

महत्वाच्या बातम्या