कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – एकनाथ शिंदे

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

दुर्गम भागात पावसाळयात तसेच इतर दिवसात सुद्धा रस्ते नसल्यामुळे आरोग्य यंत्रणा, पोलिस तसेच लोकांना खूप त्रास होत असतो. वनकायद्यामुळे रस्ते तसेच पूल बांधण्यात अडचणी येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने एकत्र बसून याचा तोडगा काढला पाहिजे. रस्ते व पुल हे लोकांच्या सोयीसाठी असून वनविभागाने सकारात्मक भुमिका घेऊन काम करण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित वनविभागतील कर्मचाऱ्यांना त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना याचा तोडगा काय आहे. रस्ते व पुल वन कायद्याअंतर्गत कसे तयार करता येऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कळविले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आढावा बैठकीतच वन मंत्री संजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून  संवाद साधून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचे सांगितले. यावेळी- रस्ते – पूल आदी ज्या कामांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तातडीने काम करण्यास सांगितले. तसेच  वन विभागने जिल्ह्यात रस्ते /पूल कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचे वर गुन्हे दाखल करू नयेत असे निर्देश दिले.

सीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

यावेळी पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना रस्त्यांची गुणवत्ता संबंधित ठेकेदाराने उत्तम ठेवली पाहिजे असे कळविले. जर गुणवत्तेत फरक पडत असेल  व रस्त्याला लवकरच गढ्ढे पडत असतील तर संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचे यावेळी सांगितले. बांधकाम अभियंत्यांनी कामावर जाऊन त्या रस्त्यांची गुणवत्ता चेक करायला हवी, असेही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

मेडिगड्डा मुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा आढावा घेऊन  मदत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मेडिगट्टा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

यावेळी  महावितरणाच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यात होणाऱ्या ब्रेक डाऊन तसेच कोरची तालुक्यात लोडशेडींग बद्दल तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश देतांना सांगितले की, जिल्ह्यातील शेवटच्या गावाच्या लोकांपर्यत वीज मिळाली पाहिजे त्याबद्दल आवश्यक कारवाई तातडीने करण्याचे निर्देश यावेळी दिले. याकामाकरीता अधिकाऱ्यांनी स्वत: याचा पाठपुरावा करायला पाहिजे असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे