कोल्हापूर – राज्यासह देशभरात कोरोनाच्या सऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना अनेक जिल्ह्यात मागील काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सुमारे अर्धा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्युदर पाहता कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता.
जिल्ह्यात 15 मे रात्री 12 पासून ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यानंतर, हा कडक लॉकडाऊन वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं होतं. आता, कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन हा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २३ मे रोजी १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. त्यानंतर २४ मे पासून राज्यातील ब्रेक दी चेन अंतर्गत असणारे नियम लागू होतील. गोकुळच्या निवडणुकांनंतर पालकमंर्यानी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांनी तीव्रता नाराजी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर शिथिल;‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंमलबजावणी
- केशर खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- दिलासादायक : गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- माहित करून घ्या बहुउपयोगी कडीपत्याचे ‘हे’ फायदे