जिल्ह्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू; माहित करून घ्या नवी नियमावली

बंद

पुणे – कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

शहरात काल नव्याने २७४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७७ हजार ५८४ इतकी झाली आहे. तर, २५७ कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६६ हजार ५९४ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ४१९ रुग्णांपैकी २९६ रुग्ण गंभीर तर ४३१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. काल कोरोनाने ६ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणेकरांसाठी नवी नियमावली :

 • दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४
 • रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार (पार्सल सेवा रात्री ११ पर्यंत) शनिवार आणि रविवार पार्सल सेवा सुरु राहणार.
 • अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद
 • सायंकाळी ५ वाजल्यापासून शहरात संचारबंदी सुरु होणार
 • लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा या कर्मचाऱ्यांना परवानगी
 • उद्याने, स्पोर्ट्स ,क्रीडांगणे पहाटे ५ ते सकाळी ९
 • अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत
 • राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह दुपारी ४ पर्यंत परवानगी
 • लेव्हल ५ असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक
 • शासकीय कार्यलये ५० टक्के क्षमतेने सूूरु
 • खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू
 • ब्युटी पार्लर, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने ४ पर्यंत सुरु राहणार.
 • कृषी संबंधित दुकाने, त्यांच्याशी निगडित आस्थापना दुपारी ४ पर्यंत
 • अंत्यविधी आणि दशक्रिया विधींना २० लॊकांची परवानगी.
 • लग्न समारंभांना ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक.
 • सामाजिक, धार्मिकव मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती आणि दुपारी ४ पर्यंत मुभा

महत्वाच्या बातम्या –