जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू!

बंद

बीड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला होता. यानंतर कोरोनाची स्थिती ही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आटोक्यात आल्यानंतर स्तरांमध्ये विभागणी करून टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंधांना शिथिलता सुरुवात करण्यात आली. यानंतर, नागरिकांची बेफिकिरी लक्षात घेता निर्बंध वाढवून संपूर्ण राज्यात तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले आहे.

तर आता राज्यातील बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक होत असून प्रशासनाने वेळीच स्थिती आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध अधिक कडक केले आहेत. आष्टी, पाटोला आणि गेवराई या तीन तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा घटत नसल्याने सर्व दुकाने फक्त ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे दुपारी १ नंतर नागरिकांनी फक्त अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणामुळे घराबाहेर पडल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.

आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यातील आकडे चिंताजनक आहेत. प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील चित्र बदलत नसल्याने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –