राज्यात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ ठिकाणी आँरेज अलर्ट

पाऊस

पुणे – मध्य महाराष्ट्रात येत्या २ दिवसांत (मंगळवारी १३) आणि (बुधवारी १४) ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मध्य महाराष्ट्राला पावसाचा आँरेज अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. यामुळे  राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज सोमवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल. परंतु, त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे या दोन्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे,

परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण अरबी समुद्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातून परतीच्या मान्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातूनही परतीच्या मान्सूनचा मुक्काम हलणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तुर, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या –