विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन maharathwada

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले . विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी  निवेदन सुद्धा यावेळी दिले. येत्या पाच तारखेपर्यंत म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यापीठातील वसुतीगृह शुल्क कमी करण्यात यावे, कृषी पदवीला व्यवसायिक दर्जा घोषित करावा.

दररोज दुध पिण्याचे हे आहेत फायदे……

परीक्षेनंतर 45 दिवसांमध्ये निकाल लावण्याची जबाबदारी पार पाडावी. तसेच 2019 साली विद्यापिठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे. यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहे. कुलगुरूंना भेटून त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सुद्धा दिले आहे. यावर विद्यापीठाकडून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या पाच तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.