आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू- सुभाष देसाई

सुभाष देसाई

शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्यास या शासनाचे प्राधान्य आहे. त्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली जात असून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे त्याचे उदाहरण आहे. या योजनेतंर्गत दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी शेतक-याचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे अल्पभूधारकांना ही या योजनेचा लाभ होणार आहे.

शेतकरी चिंतामुक्त करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेसाठी गुणवत्तापूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्व एकत्रित प्रयत्नांतून कृतीशील होत लौकीक वाढवू या, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.

मागील पाच वर्षांत एकूण १५९२ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

अधिकाऱ्याची शेतकऱ्यांना ‘अरेरावी’; उर्मठ अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

गोरगरीब, गरजू जनतेला माफक दरात जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी या शासनाने आज पासून राज्यभरात ‘शिवभोजन’ ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे.यामध्ये दहा रुपये एवढ्या नाममात्र शुल्कात जेवण मिळणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.  ते औरंगाबाद येथे बोलत होते.

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न