fbpx

सरसकट कर्जमाफी नको हा ठाकरे आणि पवारांचाच सल्ला ; सुभाष देशमुखांचा गौप्यस्फोट

सांगली: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच सरसकट कर्जमाफी नको असा सल्ला सरकारला दिला होता असा गौप्यस्फोट सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे.

शेतकरी कर्जमाफीची रक्कम ठरविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा सल्ला पवार, ठाकरे यांचाच आहे. सरसकट कर्जमाफी करू नका असे ते म्हणाले होते, असा गौप्यस्फोट सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीत केला आहे.

Add Comment

Click here to post a comment