मुंबई – वातावरणीय बदल आणि नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान होते. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. या सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात पीक विमा योजना अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार, कृषि उपायुक्त विनयकुमार औटी यांची उपस्थिती होती.
कृषि मंत्री श्री. दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध शेतकरी संघटना, कृषीभूषण, शेतकरी प्रतिनिधी यांच्या पीक विम्याविषयी विविध सूचना आणि समस्या ऐकून जाणून घेतल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून बाहेर पडावे अशी मागणी यावेळी काही लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना तयार करून त्यांची राज्य शासनाच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी प्रतिनिधींनी सुचवलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. राज्य शासनाच्या अंतर्गत नसलेल्या विषयाशी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. संपूर्ण राज्यामध्ये बीड पॅटर्न राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असे श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा दिला नाही अशा अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील तक्रार निवारण समितीचां आढावा घेण्यात येईल. शासनाने मान्य केल्यानुसार विमा कंपन्यानी विमा देणे आवश्यक आहे. जर विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता दिला नसेल राज्य शासनाचा हिश्श्याचा त्यांना देण्यात येणारा दुसरा हप्ता देण्याविषयी विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. फळपिके इतर पिकांचा आणि विमा कंपन्यांविषयी शेतकऱ्यांनी सुचना केल्यानुसार सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
कृषी विभागाने प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निरसन केले. सुरूवातीला पीक विमा योजना अंमलबजावणी सद्यस्थितीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –
- Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या
- Budget 2022 : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रासाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या
- Budget 2022 : पुढील पाच वर्षात देशात 60 लाख रोजगार उपलब्ध होणार – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वाची माहिती
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता