तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक

जालना- घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे आग लागून 10 शेतकऱ्यांचा सुमारे 20 एकरातील ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. वाऱ्यामुळे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जोराचा वारा सुटल्याने ही आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरली. पाहता पाहता ही आग जवळपास 20 एकरात पोहोचली.

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक IMG 20180209 WA0117

वाऱ्यामुळे आग अधिकच भडकल्याने शेतकऱ्यांनी ती विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र आग आटोक्यात येईपर्यंत अंदाजे 20 एकरातील ऊस जळून नष्ट झाला. तोंडाशी आलेला घास अशा दुर्घटनेत हिरावल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक IMG 20180209 WA0116

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक IMG 20180209 WA0121