ऊस शेतकर्‍यांना लवकरात लवकर मिळणार ऊसाचे पैसे

ऊस

डोईवाला साखर कारखान्याने गेल्या गाळप हंगामाचे जवळपास 21.15 करोड थकबाकीचे पैसे ऊस समितीला दिले गेले आहेत. भागातील ऊस शेतकर्‍याचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे.

शनिवारी डोईवाला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनमोहन सिंह रावत यांनी सांगितले की, गेल्या गाळप हंगामाचे पूर्ण पैसे 21,14,25,722 रुपये दिले आहेत. हे पैसे लवकरच ऊस शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील असे सांगण्यात आले आहे.

तर दूसरीकडे ऊससमितीचे सचिव गजेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, थकबाकी साखर कारखान्याकडून मिळाली आहे. कारखाना गेटवर ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचा पूर्ण डाटा कम्प्युटर मध्ये फिड करण्यात आला आहेत.

तर खरेदी केंद्रांवर डाटा अपडेट केला जात आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा हा डाटा अपलोड होईल, त्यानंतर ऊसाचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच केले जातील.

 महत्वाच्या बातम्या –