इतर कारखान्यापेक्षा उसाला जास्त दर देणार, ‘या’ कारखान्याचा गाळप हंगाम सुरू

सहकारी साखर कारखाना

मोहोळ – तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना सालाबाद प्रमाणे यंदाच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखाण्यापेक्षा जास्त दर देण्याची परंपरा कायम राखण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी.जाधव यांनी दिली.
कारखान्याचा दहावा बॉयलर अग्नी प्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष अॅड.बी.बी.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, संचालिका सौ. उमादेवी जाधव, जकराया मल्टिस्टेटच्या मुख्याधिकारी सौ. मनीषा जाधव, सौ.प्रियांका जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सत्यनारायण महापूजा वटवटेच्या सरपंच पद्मिनी काळे आणि येणकीचे ग्रामसेवक विरुदेव काळे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले की; जकराया कारखान्याने गेल्या वर्षी ऊस दराबाबत दिलेला शब्द पाळला असून कारखान्याच्या एफ.आर.पी.ची रक्कम २३१० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.मी जे तोलू शकतो तेच बोलत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला आणि परिपक्व झालेला ऊस गाळपास दिला तर चांगला साखर उतारा मिळेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. जकराया कारखान्याने जिल्ह्यातील इतर कारखाण्यापेक्षा उच्चांकी दर देण्यांची परंपरा निर्माण करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.चालू गळीत हंगामातही जास्त दर देण्याची परंपरा कायम राखून शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापन वचनबद्ध आहे.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले की, चालू गळीत हंगामात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी बी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला यावा यासाठी सक्षम ऊस तोडणी यंत्रणा उभारण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या वतीने 200 ट्रॅक्टर , 500 बैलगाडी, 200 डम्पिंग तसेच 10 तोडणी मशीन यंत्र यांचे करार करण्यात आले आहेत.

कारखान्याच्या दहा हार्वेस्टर मशिनद्वारे जवळपास दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आता को २६५ या उसाची लागण करणे थांबवायला हवे. उसाच्या या वानाला चागला उतारा नसल्याने त्याचा फटका कारखान्याला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसतो. कारखान्याने २०२२-२३ सालाच्या गळीत हंगामापासून २६५ जातीच्या उसाचे गाळप न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याऐवजी अवघ्या बारा महिन्यात गाळपास येणारा आणि चागला उतारा देणारे को २३८ आणि को ११८ या नव्या जातीचे वाण विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उसाच्या दोन्ही वाणाचे बेणे कारखान्याकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पाचीही इतर कामे प्रगतीपथावर आहेत.

कारखान्याने येत्या गळीत हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवले आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपास वेळेत आणण्यासाठी कारखान्याचा शेती विभाग सक्षम आहे. आपल्या उसाला गाळपास जाण्यास विलंब लागेल अशी शंका कोणीही मनात आणू नये. त्यामळे शेतकऱ्यांनी कारखान्यास चांगला ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहान सचिन जाधव यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –