शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या; कृषीमंत्री म्हणतात, सगळेच करतात की आत्महत्या!

भोपाळ: शेतकऱ्याच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशच्या कृषी मंत्र्यांनी अत्यंत असंवेदनशील विधान केलं आहे. मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने कर्जबाजीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. यावर मध्य प्रदेशचे कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांनी शेतकरी आत्महत्या ही जागतिक समस्या असल्याचे विधान केले आहे.

शेतकरी कृषी मंत्र्यांनी अत्यंत असंवेदनशील विधान केल्यामुळे कृषी राज्यमंत्री बाळकृष्ण पाटीदार यांच्या या वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दात निषेध केला जातो आहे. बाळकृष्ण पाटीदार म्हणाले, ‘व्यावसायिक, आयएएस-आयपीएस अधिकारी, पोलीस, सर्वसामान्य, प्रत्येक क्षेत्रातील लोक आत्महत्येच पाऊल उचलतात. हे सगळीकडेच घडतं’, या संदर्भात शेतकऱ्यांचे मित्र असल्याचा दिखावा करणाऱ्या भाजपाचा हा खरा चेहरा आहे, अशी टीका भारतीय किसान युनियनचे राज्यसचिव अनिल यादव यांनी केली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनीही पाटीदार यांच्या वक्तव्याचा निषेध केला.