VIDEO: सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करतात – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: कर्जमाफी नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत नाही अशा सगळया गोष्टीने शेतकरी हैराण झाला असतानाच आता वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली आहे. ते हल्लाबोल यात्रेदरम्यान लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी शहाजी राठोड या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रकृतीची रुग्णालयात जावून विचारपूस केली. तसेच त्याला उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत देखील केली.

त्रासून गेल्यानंतर, कंटाळून गेल्यावर, पैसा येणे बंद झाल्यावर माणूस मेटाकुटीला येतो. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. राठोड यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतू, ही आत्महत्या असल्याने अशी मदत करता येत नाही असे शेतकऱ्याच्या नातेवाईकांना सागंण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आत्महत्येचे समर्थन करत नाही. आत्महत्या करणे चुकीचे आहे, परंतू अशा दुर्देवी घटना घडल्यावर मदतीची भूमिका ठेवली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

पहा काय म्हणाले अजित पवार