अहमदनगर – राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका संपता संपत नाही. चांगला पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरणी केली. पण त्यांच्या आशेवर अस्मानी आणि सुलतानी संकटांनी पाणी फेरलंय. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट ओढावलंय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने संपवलं जीवन; आत्महत्येनंतर होतेय ‘या’ नावाची चर्चा
यंदा पावसानं वेळेत हजेरी लावत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. पण हे सुख शेतकऱ्यांच्या पदरात फार काळ राहिल असं दिसत नाही. विशेष करून मराठवाड्यातील आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आलीय. मोठ्या आशेनं इथल्या शेतकऱ्यांनी शेतात बियाणं पेरलं पण बोगस बियाणांनी घात केला. ज्या भागात उगवण झाली तिथलं पीक पाऊस घेऊन गेला.
चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करण्याची गरज- रोहिणी भरड
अशाच शेतकऱ्यांच्या अडचणी अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी जाणून घेतल्या आहेत. त्यांनी जामखेड तालुक्यातील विविध भागांमध्ये दौरा केला. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून दुबार पेरणी विषयी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बोगस बियाणांच्या संदर्भात लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी सुजय विखे यांनी दिले.
जामखेड तालुक्यातील विविध भागांमध्ये दौरा केला. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून दुपार पेरणी विषयी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बोगस बियाणांच्या संदर्भात लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. pic.twitter.com/QuFRCqAEdv
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) June 29, 2020
महत्वाच्या बातम्या –
तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..
कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’, रामदेव बाबांनी जगासमोर ठेवले कोरोनावरील औषध