सुमन चंद्रा यांनी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती केल्या जाहीर

सुमन चंद्रा यांनी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती केल्या जाहीर shetkari

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांचा सामान्य जमीन महसूल जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी काढलेल्या एका आदेशानुसार सुट देण्यात आली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शालेय तथा महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्कही माफ करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केल आहे.

अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट

बुलडाणा जिल्ह्यात यंदा चांगला व वेळेत पाऊस आला होता. त्यामुळे खरीपाचे पीक ही चांगले येण्याचे संकेत मिळाले होते. मात्र  ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणावर परतीचा व अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले सोयाबीनसह अन्य धान्य खराब झाले. जवळास पाच कोटी रुपये मुल्याच्या सोयाबीनच्या सुड्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या.

निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास सहा लाख ३४ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यात मोठी ओरड झाली होती.सोबतच राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली होती. त्या पार्श्व भूमीवर महसू व वन विभागाच्या सुचनांच्या आधारावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी चार फेब्रुवारी रोजी  शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट देणे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे.