स्वाभीमानी शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसं पासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्यातच काही दिवसं पूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारी २०२० रोजी झलेल्या अवकाळी पावसाने ,वादळी वाऱ्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पवना धरणातून पाणी साेडल्याने पवना नदीला पूर

या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करुन सुध्दा लक्ष न दिल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात सकडकी फळे टाकून जिल्हा कृषी अधिक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून आगळेवेगळे आंदोलन केले.परभणी तालुक्यातील मांडाखळी व जांब या मंडळात संत्रा पिकांच्या फळबागांचे 2 फेब्रुवारी २०२० रोजी रात्री झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

थंडीने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गारठला

या वादळी वाऱ्यामुळे यामुळे फळबाग व वृक्ष उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामध्येही नुकसान झाले होते. मात्र, त्याची नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. तोच शेतकऱ्यांवर परत एकदा संकट ओढावले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.