‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण uposhan

शासनाने दूध दरात दोन रुपयांनी कपात केल्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर २७ रुपयांवरून २५ रुपयेवर पोहोचले आहे. मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत खरेदी केल्या जाणाऱ्या दूध दर तसेच वाहतूक खर्च, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काल बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दूधदर समान करण्यात आले. परंतु, दोन महिन्यांनंतर पश्चिम महाराष्ट्रातील दुधाचे दर प्रतिलिटर ३२ रुपये करण्यात आले. परंतु, मराठवाड्यातील दूध उत्पादकांना अजूनही शासकीय दुग्ध शाळेत २५ रुपये लिटरने दूध घालावे लागत आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईचे वाटप तत्काळ करण्यात यावे.

अनेक आजारांवर गुणकारी टोमॅटो

या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली डिगांबर पवार, भास्कर खटींग, रामप्रसाद गमे, दीपक गरुड, माऊली बोकारे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.