कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. मध्यंतरी आलेला पाऊस आणि उन्हामुळे यंदा संत्र्याला चांगलाच बहार आला आहे.
उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक
सध्या जवळपास दररोज २०० टन टेम्पो बाजारात येत असून विक्री वाढली आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे. थेट बगिच्यातून संत्र्याची विक्री मृग बहारात नागपुरी संत्र्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक येथून प्रचंड मागणी असते. काही वर्षांपूर्वी काठमांडू, जम्मूलादेखील येथील संत्रा रवाना झाला होता. शेतकऱ्यांकडून कमिशन घेऊ नये, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे असल्याने अडतिया कमिशन व्यापाऱ्यांकडून घेतात. कमिशन टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी जानेवारीपासूनच बगिच्यातून खरेदी सुरू केली आहे.
हजारो टन संत्र्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू आहे. वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कळमन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक कमी आहे. दररोज १५० ते १०० टेम्पोची आवक आहे. यंदा उत्पादन जास्त असल्याने भाव वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.