मांडूळ आणि शिंगी घुबडांचीच ‘तस्करी’ का?

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : ज्या वन्य प्राण्यांची सगळ्यात जास्त तस्करी होते. त्यामध्ये ‘मांडूळ’ आणि ‘शिंगी घुबडां’चा समावेश आहे. शनिवारी औरंगाबादेत दोन मांडगूळ जातीचे साप पोलिसांनी पकडले. काय आहे या सापाचे आणि घुबडाचे महत्व?

मांडूळ हा बिनविषारी साप आहे. मांडूळ ही गांडूळाच्या प्रवर्गातील पण आकाराने मोठी असलेली सापाची जात आहे. मांडूळ तेच करते, जे गांडूळ मातीच्या खाली राहून करते. माती भुशभुशीत करणे हेच मांडूळाचे काम आहे. पण हे काम गांडूळ किंवा मांडूळ कोणत्याही ठिकाणी करू शकत नाही. त्यासाठी जमीन टणक असून चालत नाही. काळ्या किंवा थोड्या पांढऱ्या मातीत ते काम करू शकतात. पण त्याचा वापर शेतीच्या कामाला करून घेण्याऐवजी दूसऱ्याच कामाला जास्त करून घेतला जातो. त्यासाठी लाखों रूपयांची तस्करी केली जाते.

हे साप ज्या ठिकाणी सोडले, त्या ठिकाणापासून त्यांना पोषक असणारी (भुशभुशीत) जमीन शोधून काढतात. त्या ठिकाणी म्हणे ‘गुप्तधन’ सापडते, असा समज आहे. म्हणुन ‘काळी जादू’ करण्यासाठी या सापांची तस्करी होते. तसाच काहीसा प्रकार ‘शिंगी घुबडां’च्या बाबतीत आहे. ही डोंगराच्या किंवा इमारतींच्या कपारीत वास्तव्याला असतात. त्यांचे आवडते खाद्य उंदीर आहे.

याची माहीती अशी की, काही वर्षांपूर्वी नेरळच्या लेणीची साफसाफाई करतांना या शिंगी घुबडाच्या घरट्याला धक्का लागला. त्या घरट्यातील पिल्ले खाली पडले आणि र्दूदैवाने त्यांची आई त्या अपघातात मृत्यूमुखी पडली. त्या पिल्लांना वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले. त्यांनी ती पिल्लांना वाचविण्यासाठी पुण्याचे निलमकुमार खैरेंची मदत घेतली. त्यांनी पुण्याहून एक पथक धाडले. त्यांनी तोपर्य॔त उंदराचे तुकडे करून द्यायला सांगितले होते. तसे दिल्यावर त्या प्रत्येक तुकड्याचे एक-एक गोळा म्हणजे छोट्या बॉलच्या आकाराची विष्ठा टाकतात. हेच तंत्र काळी जादू (ब्लॅक मॅजिक) करणारे वापरतात. हे शिंगी घुबडे ज्या ठिकाणी विष्ठा करतात. त्या ठिकाणी गुप्तधन असते, असा समज आहे. त्यासाठी या घुबडांची तस्करी होते. ती पण लाखोत होते. याच पद्धतीने २१ नखे असणाऱ्या कासवाची तस्करी केली जाते.

त्या लिंकमधला एक तरी जण फुटल्याशिवाय ही माहीती पोलिस किंवा वनाधिकाऱ्यांना मिळत नाही. औरंगाबादमध्ये यापुर्वीही मांडूळ तस्कर गुन्हे शाखेने पकडले आहेत. त्यामुळे लिंक आधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेली होती, त्याच आधारावर ही कारवाई झालेली असण्याचा दाट संशय आहे.