जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ योजना राबविण्यास मंजुरी – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांच्या इमारतीचे बांधकाम विस्तारीकरण, दुरुस्ती देखभाल, इमारतीचे, विद्युत जोडणीचे लेखापरिक्षण, रुग्णवाहिकांची खरेदी करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती … Read more

समर्पित निधी प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – सन  2021 – 22 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर अखेर 170 कोटी मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 9.18 टक्के खर्च झाला आहे तसेच अनुसुचित जाती उपयोजनेच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी  27.44 टक्के खर्च झाला आहे. समर्पित केलेला 44 कोटी 55 लक्ष निधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज … Read more

विकास कामांसाठी नगर परिषदेला भरघोस निधी उपलब्ध करुन देणार – एकनाथ शिंदे

परभणी – नागरीस्तरावर काम असताना लोकाभिमुख निर्णय घेण्याची संधी मिळत असते. त्याच संधीला सुवर्णसंधी बनवुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. निधी अभावी लोकविकासाची कामे अडणार नाहीत  याची दक्षता घेत असतांनाच चांगले व गुणवत्तापुर्ण काम करण्यासाठी पुर्णा नगर परिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील विविध विकास कामांसाठीचे प्रस्ताव सादर करताच प्राधान्याने  नगर परिषदेला भरघोस निधी … Read more

क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार – सुनील केदार

बुलडाणा – मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र आता कोरोना कमी होत आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्राची नेत्रदीपक प्रगती आहे. या जिल्ह्यात क्रिडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक क्रिडा सुविधा, आधुनिक साहित्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून देणार. त्यामुळे जिल्ह्याचा … Read more

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते . व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. … Read more

पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी वितरित करा – अशोक चव्हाण यांचे निर्देश

नांदेड – अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध गावात नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन धीर दिला होता. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यात मार्च ते सप्टेंबर 2021 या कालवधीत एकूण 455 कोटी 72 … Read more

बांधकाम कामगारांना ७ कोटी ३४ लाख कोटींच्या निधीचे वाटप

मुंबई – इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांची आढावा बैठक घेतली, तेव्हा सदर … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने निधी जमा करण्यात यावा – शंभूराज देसाई

वाशिम –  वाशिम जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना   शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात वाटप करण्यात आला असून तो निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे … Read more

मोठा निर्णय : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले. त्यानुसार तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो … Read more

जिल्‍हा वार्षिक योजना सन २०२१-२२ चा ६२५ कोटींचा निधी विहित वेळेत खर्च करावा – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 15 लाख असा एकूण 625 कोटी 25 लाखाचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी सर्व संबंधित यंत्रणांनी विहित कालमर्यादेत व मंजूर असलेल्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. … Read more