राज्यातील 15 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान

पुणे – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Untimely rain) पावसाने हजेरी लावली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर – सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल १०० कोटींचे झाले नुकसान

औरंगाबाद – पावसाने औरंगाबाद जिल्ह्यचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात जवळपास १०४ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नुकसानीची माहिती पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सादर केली. यात रस्त्यांची दुरूस्ती, पुलांची कामे, इमारत दुरूस्ती, नाल्यांची दुरूस्ती या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली … Read more

पावसाअभावी नुकसान झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा – नरहरी झिरवाळ

नाशिक – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे … Read more

चांगली बातमी – पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई – गारपीट व अवेळी पावसामुळे  मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले.  गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने  शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप … Read more

राज्यात आज पाऊस कुठं होणार? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर सध्या पावसाची उघडीप चालू असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना या महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची … Read more

राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज 15 ऑक्टोबर 2020 रोजीही साडेआठ तास कायम राहणार आहे. हा पट्टा पश्चिम- वायव्य भागात सरकेल आणि अरेबियन समुद्राच्या पूर्व मध्य तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात आणि अरबी समुद्राजवळ उत्तर-पूर्व भागात आणि महाराष्ट्र आणि दक्षिण … Read more

परतीच्या पावसामुळे थोडासा दिलासा ; तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला

परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्पांत सध्या केवळ 29 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील 132 लघुप्रकल्पांत केवळ 46.81 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागाला टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात सुरवातीपासून पावसाने पाठ … Read more

पावसामुळे द्राक्ष बागांचे ९ हजार कोटींवर नुकसान

राज्याच्या फळशेतीत सतत पडणाऱ्या पाऊसामुळे द्राक्षबागा काळवंडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सर्व द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका नाशिक विभागातील बागांना बसला आहे. यातील सुमारे ९० हजार एकरमधील बागा १०० टक्के वाया गेल्याचा दावा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केला आहे. तसेच कृषी विभागाने ५० हजार एकर द्राक्ष बागा नष्ट झाल्याचे म्हटले … Read more

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या … Read more