शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाला लक्षात घेऊन आज शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

शरद पवार, राहुल गांधीं

नवी दिल्ली – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

आज शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या  ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाला लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली. तर, आजचा दिवस देखील या आंदोलनासाठी महत्वाचा ठरणार आहे.

सरकारची शेतकऱ्यांसोबत आज आणखी एक बैठक असून शरद पवार व काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह पाच प्रतिनिधींचं पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. याबाबत सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की विरोधी पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

सीताराम येचुरी म्हणाले की, “या प्रतिनिधी मंडळात राहुल गांधी, शरद पवार यांच्यासहित इतर विरोधी पक्षाचे नेते सामिल होणार आहेत. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींना केवळ पाच लोकांना भेटायची अनुमती आहे.” त्यामुळे या बैठकीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद काही सकारात्मक भूमिका घेणार का? याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या –