जमिनीचा मोबदला न दिल्याने बाजार समितीच्या सचिवाची खुर्चीच नेली उचलून

सचिवाची खुर्चीच नेली उचलून

औरंगाबाद: जाधववाडीतील रहिवासी पंडित हरणे यांनी १० एकर जमीन बाजार समितीने १९८७ मध्ये संपादित केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या दहा एकर जमिनीचा वाढीव मोबदला पंडित हरणे यांना दिला नाही.

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

पण त्यांना त्या जमिनीचा मोबदला शासकीय दरानुसार मिळत नव्हता. त्यामुळे पंडित हरणे यांनी शासकीय दरानुसार मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार त्यांचा ९३ लाख ९२ हजार ९८५ रुपयांचा मोबदला परतावा या प्रकरणी न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी जप्तीचे आदेश दिले होते.

शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद

पण दहा एकर जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्यामुळे बाजार समितीच्या सचिव, सहसचिव यांच्या खुर्चीसह संगणक साहित्य व दोन वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे ही कारवाई करताना सचिव, सभापती कार्यालयात उपस्थित नव्हते.  तसेच या कारवाईमध्ये त्यांच्या  खुर्ची संगणक साहित्य याबरोबरच दोन चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या –

रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकऱ्यांचा मातोश्री बंगल्यापर्यंत मोर्चा

कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

दूध उत्पादन वाढीसाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड