महाराष्ट्रातील या साखर कारखान्याला मिळणार ‘नवसंजीवनी’

राहुरी (राजेंद्र साळवे) : डॉ.तनपुरे साखर कारखान्याला आता सुगीचे दिवस येणार असे सुतोवाच सभासद ,शेतकरी ;कामगारांमधुन सकारात्मक दृष्ट्या ऐकु येऊ लागले आहेत. 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अहमदनगर जिल्हा बॅकेने डॉ.तनपुरे कारखान्याचा सुपूर्तनामा बॅकेचे प्राधिकृत अधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांनी डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उद्यसिंह पाटील व त्यांच्या संचालक मंड़ळाकड़े सोपविला.या कारखान्याला सुरू करण्याची परवानगी आता जवळजवळ पुर्णच होणार अशी खात्री बाळगण्यास काहीच हरकत नाही, असे म्हणने उचित ठरेल.हा कारखाना पुन्हा नव्याजोमाने सुरू होणार म्हणुन तालुक्यातील व्यापारी वर्गामधे आनंदाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र पहाण्यास मिळत आहे.
डॉ.तनपुरे साखर कारखाना तालुक्यातील शेतक-यांचे श्रध्दास्थान आहे, कामधेनु आहे,म्हणून तालुक्याची जी काही प्रगती झाली असेल,त्यामधे कारखान्याचा मोलाचा वाटा आहे असे मान्यच करावे लागेल असे जुणे जाणकार मंड़ळी बोलुन दाखवत आहेत . आता हा कारखाना सर्व तांत्रिक अडचणी दुर करून सुरू करावा अशी मनापासून प्रार्थना हा शेतकरी राजा व कामगार देवाकड़े करीत आहे.ऊस उत्पादक शेतकरी व कामगार कारखान्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्यास तत्पर आहे असे सर्व स्तरातुन बोलले जात आहे.
तनपुरे कारखान्यावर तब्बल 88 कोटी रूपयांचे कर्ज थकलेले होते ,त्यासाठी जिल्हा बॅकेने या कारखान्यावर ताबा घेतला होता.तनपुरे कारखाना निवडणुकीच्या वेळी परिवर्तन मंड़ळाच्या माध्यमातुन .सुजय विखे यांनी आपले संचालक मंड़ळ निवड़ुन आणले, व तालुक्यातील दीग्गज्जांना ‘ हम भी कुछ कम नही ‘ असे दाखउन दिले . सुजय विखे यांच्यावर जो विश्वास सभासद कामगारांनी दाखविला त्यास आता तडा जाऊ देणार नाही असे त्यांचे समर्थक जनसामान्यांकड़े बोलताना दिसतात .कामगारांमधे आता जास्त उत्साह व जल्लोश पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी यांना देखिल अत्यांनंद झालेला आहे हे पाहण्यास मिळाले.सेवानिवृत्त कर्मचा-यांचा निवृत्त वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार म्हणुन हे कर्मचारी आनंदी झाल्याचे चित्र स्पष्टपणे दीसुन आले. फंड ,थकीत वेतन ,ग्रॅच्युइटी इ.मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. राहुरी चे आमदार शिवाजीराव कर्ड़ीले यांनी ‘ कटाक्षाने ‘ आपली नजर डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे रोखुन धरल्याने त्यांचा देखिल सकारात्मक दृष्टीकोन दीसुन आला.सर्व ‘ सुरळीत ‘ घड़ले असे ऊस उत्पादक ,सभासद ,कामगार यांच्या चर्चेतुन ऐकावयास मिळत आहे.कर्जाच्या पुनर्गठनाचा जो ऐतिहासिक निर्णय झाला व अमलात आला त्यासाठी जिल्हा बॅकेने एकुण 34 शर्थी ठेवल्या होत्या व त्या मान्य झाल्यावरच डॉ.तनपुरे चा ताबा संचालक मंड़ळाकड़े देण्यात आला.जिल्हा बॅकेचा हा पहीला वहीला अनुभव जिल्ह्यामध्ये तरी असावा असे एकंदीरीत वाटते.
संचालकांवर आता मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे . त्यानुसार ते पुर्ण ‘ ताकदीनिशी ‘ हा कारखाना सुरू करून या तालुक्यातील गेलेले गरतवैभव पुन्हा मिळउन देतील असा विश्वास जनतेला या माध्यमातुन देतील व लागलेले ग्रहन एकदाचे सुटेल असा सामान्य जनतेचा विश्वास आहे.