Tata Car Update | टाटा (TATA) च्या अपकमिंग कार बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुसज्ज

Tata Car Update | टाटा (TATA) च्या अपकमिंग कार बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुसज्ज

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार लॉंच करत असते. टाटा ने नुकतीच आपली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. यापुढे सुद्धा टाटा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह अनेक गोष्टी असतील.

टाटा अपकमिंग कार 

Tata Harrier Facelift ( टाटा हॅरीयर फेसलिफ्ट )

टाटाच्या सर्वच गाड्या आकर्षक असतात. त्यात आणखी एका आकर्षक कारचा समावेश टाटा लवकरच करणार आहे. ती कार म्हणजे Tata Harrier Facelift ( टाटा हॅरीयर फेसलिफ्ट ). ही एक मध्यम आकाराची SUV आहे. या कारच्या मॉडेलची चाचणी टेस्ट सुरू झाली आहे. यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट कोलिजन वॉर्निंग आणि ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) टेक्नॉलॉजी असे अनेक आकर्षक फीचर आहेत.

Tata Safari Facelift ( टाटा सफारी फेसलिफ्ट )

टाटा मोटर्सची Tata Safari Facelift ( टाटा सफारी फेसलिफ्ट ) ही SUV मोठ्या अपडेट्स बाजारात येणार आहे. या SUV च्या नवीन मॉडेल मध्ये हॅरीयर सारखे बदल पाहायला मिळतील. ही SUV महिंद्राच्या XUV700 ला टक्कर देण्यासाठी सुसज्ज असेल. या नवीन कार मध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिन असेल जे 173bhp पॉवर आणि 350Nm पीक-टार्क निर्माण करेल.

Tata Nexon CNG ( टाटा नेक्सन सीएनजी)

टाटा सध्या Tata Nexon CNG ( टाटा नेक्सन सीएनजी) ची टेस्टिंग करत आहे. हे मॉडेल 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कार मध्ये 1.2L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन सोबतच फॅक्टरी फिट केलेले CNG किट मिळू शकतो.

Tata Punch EV ( टाटा पंच ई व्ही )

टाटा आपली Tata Punch EV ( टाटा पंच ई व्ही ) 2023 मध्ये लाँच करू शकते. ही कार टाटा मोटर्सच्या पंच मॉडेल वर आधारित एक इलेक्ट्रिक SUV आहे.

महत्वाच्या बातम्या